सोमवार, 31 दिसंबर 2018

कोरेगाव महायुद्ध

माणुसकी मिळवण्या करीता
              झालेले युद्ध : भिमा कोरेगाव
........................................................................
                  दिनांक १ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी महाराज यांना इथल्या धर्म अभिमान्यांनी घरभेदीच्या सहाय्याने रत्नागिरी जिल्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा या गावी औरंगजेब बादशहाच्या सरदार मुकरबाद आणि त्याचा मुलगा इखलास खान याने कैद केली. तर दिनांक ११ मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराज्यांच्या हत्या हिंदू धर्मशास्त्र मनुस्मृतीनुसार भीमा कोरेगाव परिसरात करण्यात आली, शंभु राजे जवळ जवळ १ महिना ११ दिवस औरंगजेबच्या कैदेत होते. ते ही मराठ्यांच्या महाराष्ट्रात, पण एक ही मर्द मराठा शिव पुत्रास सोडवण्याचे धाडस करू शकला नाही. एव्हडेच काय शंभू राजाच्या हत्येनंतर त्यांच्या छिन्न विछिन्न देहाला अग्नी द्यायला एक ही मराठा, कुणबी, तेली, माळी, सोनार, कुंभार अथवा कोणी पंडित पुढे आला नाही, वडूज गावच्या महारानी या रण धुरंधर शिवबाच्या सुपुत्राच्या शरीरास जोडून मुखाग्नी दिला. का महारांना बादशहाची भीती नाही वाटली जी मराठ्यांना वाटली? आज ही छत्रपती संभाजी महाराज्यांची समाधी वडूजच्या महार वाड्यातच आहे. तर जिजाऊचा वाडा पचाडच्या महार वाड्याच्या मधेच आहे. काय हा योगा योग म्हणायचा की रक्ताचे नाते म्हणायचे?_*

_संभाजी महाराज्यांच्या हत्येनंतर मराठी साम्राज्य श्री. वर्धनच्या मनुस्मृती ग्रस्त ब्राह्मणांच्या हातात गेले, त्याचीच औलाद दुसरा बाजीराव. सन १८१७ साली ब्रिटिश आणि पेशव्यांचे संबंध विकोपाला गेले आणि बाजीरावाने युद्धाची तयारी सुरु केली. पेशव्याच्या बाजूने निपणकर अक्कल कोटवाले भोसले, निबालकर, घोरपडे, जाधव, विचुरकर, राजे बहाद्दूर, भोईटे, पुरंदरे छोटे मोठे सरदार आणि सातारचे छत्रपतींचे राज घराणे, या फोजेचा सेनापती होता बापू गोखले!_

_मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश्या मधील विकोपाला गेलेले संबंध पाहून युद्ध कधी ही होईल. तेंव्हा आपण ही आपला पराक्रम शिव राज्यासाठी खर्ची घालावा आणि इथे ठाण मांडून बसलेल्या गोऱ्यास कायमचे हाकलून देऊया. या उदात्त भावनेने शिवाजी संभाजी महाराज्यांच्या मराठे शाहितल्या सरदार शिदनाक महार यांचा नातू सिदनाक महार ज्याने खरड्याच्या लढाईत अप्रतिम पराक्रम गाजविला होता._

*_पठाणांच्या तावडीत सापडलेल्या मराठा सरदार भाऊ पटवर्धन याचे रक्षण करून हरणारी मराठी सेनेस विजय मिळवून दिला होता. असा हा शूर सरदार महार जातीतल्या अन्य सरदारास घेऊन दुसऱ्या बाजीराव पेशव्यास भेटून आम्ही महार सरदार तुमच्या बाजूने ब्रिटिशा विरुद्ध लढाईत उतरू इच्छितो. तुम्ही आम्ही सारे एकत्र येऊन ब्रिटिशाला हाकलून लावुया. आम्हांला इंग्रजांच्या बाजूने लढायचे नाही. परंतु माय बाप तुमच्या लष्करात आणि राज्यात आमच्या महार जातीचे स्थान काय राहणार? आमच्या गळ्यातील मडके कंबरेचा झाडू खांद्यावरच्या घोंगडी आणि हातातील घुंगराची काठी नष्ट करणार काय? आम्हांला माणसा सारखी वागणूक मिळणार काय?_*

*_काय मागितले सिदनाक महार? फक्त माणुसकी! पण आमच्या राज्याच्या राज्यास आपल्या बापाची जागिरदारी समजणाऱ्या या उन्मत घमंडखोर आणि मनुस्मृतींनी आंधळ्या झालेल्या या मूर्ख  बाजीरावाने तिरस्काराने जबाब दिला. सुईच्या अग्रावर थरथरत रहाणाऱ्या धुळीच्या कणा एव्हडी ही स्थान तुम्हां महारास माझ्या राज्यात रहाणार नाही. तुम्ही आमच्या बाजूने जरी लढलात तरी ही तुम्हाला तुमच्या पायरीवरच राहावे लागेल. ब्राह्मण धर्मात कोणताच बदल घडणार नाही. हे पक्के ध्यानात धरावे. तुमची आम्हाला गरज नाही आणि जर तुम्हांला तुमचे स्थान हवे असेल तर ते मिळूनच दाखवा. बाजीरावाच्या उन्माद उत्तराने सिदनाक महारांच्या तळपायाची आग मास्तकास भिडली आणि तो योद्धा कडाडले. धर्माचे तत्वज्ञान सांगणाऱ्या भेकडा पुरुषार्थ हाच जर तुझा क्षत्रिय धर्म असेल आणि तुम्ही खरे क्षत्रिय असाल तर आमचा युद्धात पाडाव करून दाखवाच. आजपासून तुमच्या जीवन मरणाच्या सीमा आम्ही ठरवू. असे निर्वाणीचा इशारा देऊन महार सरदार पेशवे दरबारातून बाहेर पडले._*

_१९ ऑक्टोंबर १८१७ ला विजया दशमीच्या मुहूर्त साधून पेशव्यांचे सैन्य जमा झाले. २९ ऑक्टोबर १८१७ ला बापू गोखल्याने मूळा मुठा नदीच्या बेटावर हल्ला केला. बेट लुटून जाळण्यात आले, ३० ऑक्टोबर गणेश खिंडीवर पेशव्याने हल्ला केला. दिनांक ५ नोव्हेंबर १८१७ रोजी खडकीच्या युद्धास सुरुवात झाली. मात्र पेशव्यास यशाने हुलकावणी दिली. तर दिनांक ६ नोव्हेंबर १८१७ रोजी केवळ २०० (दोनशे) सैनिकांच्या बळावर आणि पेशव्याचा फितूर ब्राह्मण बालाजी नाथूच्या मदतीने झुलमी शनिवार वाड्यावरचा भगवा उतरवून त्या ठिकाणी गोऱ्यांचा युनियन जॅक फडकविण्यात आला._ *_कोणी मदत केली बालाजी नाथू! कश्यासाठी? स्वतःच्या फायद्यासाठी शिदनाक महार काय मागत होता? फक्त माणुसकी! सत्ता जहागिरी नाही. पेशव्याची गादीच गेली आणि बाजीराव माहुलीला पळून गेला. पेशव्याच्या सैन्याची दानादान उडाली. सेनापती बापू गोखले पेशव्यास येऊन मिळाल्या नंतर गनिमी काव्याने बाजीरावाने पुन्हा एकदा सैन्याची जमवा जमाव करून युद्धाच्या तयारीस लागला व जे युद्ध झाले. ज्यात पेशवाईचा अस्त आणि ब्रिटिश सत्तेचा निरंकुश अंमल ते युद्ध म्हणजेच भीमा कोरेगावचे महार सैनिकांच्या महान विजयाची शौर्य गाथा होय!_*

_ब्रिगेडियर जनरल स्मिथच्या सैन्यास झुकांड्या देत बाजीरावने ३०००० घोड दल १३८०० पाय दल घेऊन श्रीमंत बाजीराव पुण्यापासून ८ कोसावर असलेल्या फुल गावला दिनांक ३० डिसेंबर १८१७ रोजी दाखल झाला. सदरची खबर पुण्याच्या बंदोबस्त सांभाळणाऱ्या कर्नल बार्टला समजली. परंतु त्याच्या जवळ पुरेसे सैन्य बळ नसल्यामुळे त्याने सातारा शिरूर छावणीला "लाखोटा" पाठवुन मदत मागितली._ *_कर्नल बार्टने पाठविलेला "लखोटा" लेफ्टनंट कर्नल फिल्समनने वाचून या कामासाठी कार्य कुशल साहसी, हमखास विजय मिळवून देणारी ज्यामध्ये महार जातीचे सैनिक मोठ्या प्रमाणात आहे. अशी सैन्य तुकडी, ज्या महारांची पेशव्याशी असलेले हाड वैर या गोऱ्या अधिकाऱ्यास चांगले ठाऊक होते. त्याने त्याच "बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री सेकण्ड बटालियन फर्स्ट रेजिमेंट" ची ताबडतोब निवड करून कॅप्टन स्टोनटनाला ५०० महार सैनिक २७० घोडेस्वार तोफा ओढणारी २५ माणसे आणि २ तोफा चालविणारे असा विषम मानवी बळ देऊन पेशवे रुपी मृत्यूच्या कराल जबड्यात ढकलले. परंतु त्यास महार सैन्याच्या पराक्रम वर पूर्ण विश्वास होता. महार मरतील, पण पाठ दाखविणार नाहीत. हे त्याला पक्के माहित होते._*

*_महार सैनिक २५ किलो मीटरचा प्रवास करून दिनांक १ जानेवारी १८१८ रोजी सकाळी ८ वाजता कोरेगाव या ठिकाणी पोचले. भीमा नदीच्या पैल तीरावर दुसरा बाजीराव जातीने ३०००० पेक्षा जास्त शस्त्र सज्ज फौजेसह युद्धास तयारच होता. त्याचा यावेळी ही सरदार होता बापू गोखले!_* _तर सैन्यात मात्तबर होळकर जाधव, गायकवाड, विंचूरकर, पुरंदरे भोसले, सातारचे भोसले, निंबाळकर, घोरपडे इत्यादी दिनांक १ जानेवारी १८१८ रोजी कॅप्टन स्टोनटनाने पूर्ण कोरेगाव आपल्या ताब्यात घेतले. मात्र कोरे गावातील गढी आणि धर्म शाळा मात्र ताब्यात न घेतल्याचा परिणाम हि त्याच्या सैन्यास भोगावा लागला. सकाळी १० वाजता पेशव्यांनी आक्रमण केले. पेशव्यांच्या सेनापतीस ब्रिटिशांच्या अल्प सैन्याची पुरेपूर कल्पना होती आणि स्वतःच्या बलाढ्य सैन्याबद्दल फाजील आत्म विश्वासाच्या जोरावर त्याने चढाई केली._

*_५०० महार सैनिकांनी सतत ४ तास गोळ्यांचा पाऊस पाडून पेशवे सैनिकांची दानादान उडवली. तर ब्रिटिश तोफ सांभाळणाऱ्या लेफ्टनंट चिशोल्माने तोफांचा भडीमार करून विरोधी सैन्याचे प्रचंड नुकसान केले. स्वतः बाजीराव तोफेच्या जबरदस्त हदर्याने त्याच्या पाया खालची जमीन सरकली व पायांना कंप सुटला. बाजीरावाच्या सैन्याच्या होत असलेली वाताहत थांबविण्यासाठी सेनापती बापू गोखले आणि विंचूरकर यांनी ब्रिटिश सैन्याच्या पिछाडीने कोरेगावात प्रवेश करून धर्म शाळा ताब्यात घेतली. परंतु ती पुन्हा महार सैनिकांनी ताब्यात घेतली. दरम्यान पेशव्यांच्या सैन्याने तोफ चालविणाऱ्या लेफ्टनंट चिशोल्मास एकटे गाठून त्याचे शीर धडापासून छाटून भाल्याच्या टोकावर नाचवत "मारला... मारला... तोफ वाला मारला"असा उन्माद करीत भीमेचे पात्रं ओलांडून हात घाईवर आले. दरम्यान ब्रिटिश सैनिकांच्या गोळ्या सुद्धा संपल्या होत्या. त्याच बरोबर बाजीरावाच्या सैन्याने कोरेगावतील गादीवर कब्जा केला होता. तिथून जबरदस्त मारा सुरु होता._*

_पेशव्यांचा भडीमाराने ब्रिटिश अधिकारी भांबावून गेले. काही अधिकारी कॅप्टन स्टोनटनला माघार घेण्यासाठी विनवण्या करू लागले. तेव्हा महार सैनिकांनी त्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करून कॅप्टन स्टोनटनला निर्वाणीचा शब्दात सांगितले. ज्यांना जीवाची भीती आहे.त्यांनी खुशाल रणातून माघार घ्यावी. परंतु आम्ही महार सैनिक पेशव्यां सोबत लढूनच मरू. मात्र मरणापूर्वी माघार घेणार नाही. महार सैन्याच्या दृढ निश्चयाने कॅप्टन स्टोनटनला बळ चढले आणि आता बंदुकी सोडून तलवारीला तलवारी भिडल्या. महार सैन्याने आपल्या कुशाग्र बुद्धीने वेगवेगळ्या लढाऊ रचना रचून बाजीरावाच्या सैन्यास जेरीस आणले. पोटात ना होते अन्न ना पाणी समोर होते. बलाढ्य शत्रू जे तुला माणुसकी नाकारत होते._

*_"एक तर मर अथवा मारून जग" असा त्या महार सैनिकास त्याचे मन बजावीत होते. भीमेच्या पैलतिरावरून बाजीराव युद्ध पाहत होता. तर आकाशातील सूर्य भास्कर आपल्या सहस्त्रधारांनी त्यावीर पुरुषांना चेतवत होता. त्याने एका स्त्रीसाठी झालेले राम - रावण युद्ध पहिले होते. सत्तेसाठी कौरव पांडवांना कोंबड्या सारखे भांडताना पहिले होते. परंतु हे युद्ध ना राज गादीसाठी होते. ना स्वर्ग प्राप्तीसाठी होते, हे युद्ध होते माणूस म्हणून जगण्यासाठीचे!_* _दिनकर ही खुश होता, नेहमीपेक्षा जरा जास्तच आग ओकत होता. ज्यात महालातील गोरी चामडी भाजून निघत होती. तर दुसऱ्या बाजूने महारांची वर्मी घाव पडत होते. महारांच्या मजबूत आणि दणकट हातातील तलवारीचे घाव झेलता झेलता पेशव्याची सेना मेटाकुटीस आली. लढाईचे पालटणारे स्वरूप आणि नूर बघून बाजीरावाने रणगणातून धूम ठोकली._ *_बाजीरावाचे अनुकरण त्याच्या जीवावर आणि भरवश्यावर अवलंबून असलेल्या आणि जीवाची भीती असणाऱ्यांनी तात्काळ केले. सेनापती बापू गोखल्यांच्या एकुलत्या पुत्राच्या गोविंद बाबाची तुकडी त्याला युध्दात एकट्याला सोडून जिवाच्या आकांताने पळत सुटली. मात्र तश्या हि परिस्थितीत गोविंद बाबा तलवार गाजवीत होता. त्याची महार सैनिक सोन नाकाशी पडली._*

_मदमस्त हत्तीप्रमाणे एक दुसऱ्यावर चालून गेले. परंतु सोननाक महारांच्या जबरदस्त तलवारीचा पहिलाच घाव गोविंद बाबाला चुकवता आला नाही. उजव्या अंगावर घाव झेलीत पुन्हा चढाई करण्याचा प्रयत्न असफल ठरला._ *_सोननाकाच्या दुसऱ्या घाव सरशी गोविंद बाबा "आई ग..." अशी आर्त किंकाळी फोडून भीमेच्या किनाऱ्या वरील मातीत मिसळला, एक एक महार सैनिक ५६ - ५६ पेशव्यांच्या सैनिकाला कापून काढीत होता, सेनापती बापू गोखल्यांल त्याचा तारणा ताठा एकुलता एक पुत्र युद्ध भूमीवर बेवारस पडल्याचे समजताच त्याच्या सर्वांगास कंप सुटला. तो धीपाड योद्धा आपल्या लेकरास शोधीत युद्ध भूमीचाच पडू लागला, भीमेच्या तटावर त्याला त्याच्या पुत्राचे कलेवर सापडल्यावर तो शूर सेनापती मूक आक्रोश करू लागला. इतक्यात त्याच्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडला. मानवर करून पाहिले असता तो विंचूरकर सरदार होता. विंचूरकर धीर गंभीर आवाजात म्हणाला - "उठा सेनापती शोक करण्यात अर्थ नाही, खूप मजल मारायची आहे." पुत्राच्या मरणाने बापाचे काळीज फाटले होते. तो शत्रूच्या नारडीचा घोट घेऊ इच्छित होता. पण समयाने कूस बदलली होती. पेशव्याच्या सैन्याला युद्ध भूमीवर महारानी चिर निद्रेस पाठविले होते._*

_जे मूठभर आपला जीव घेऊन पळाले होते. तेच तेव्हडे वाचले होते. सूड घेऊ पाहणारा सेनापती हतबल होता. विंचुरकरांचा शहाणपणाचा सल्ला शिरोधार्य मानून पेशव्यांचा सेनापती बापू गोखले सुद्धा त्याच्या धण्याप्रमाणे रणभूमी सोडून बाजीरावाच्या मागे चालता झाला. युद्धाचा निकाल लागला होता. ज्या शिदनाक सरदाराने बाजीरावास आव्हान दिले होते. ते त्याच्या शूरवीरांनी बाजीरावास उघड्या डोळ्यांनी पहायला भाग पाडले होते. ज्या भीमा कोरेगावच्या भूमीवर मराठ्यांच्या छत्रपती संभाजी महाराज्याना मनुस्मृतीनुसार हाल हाल करून ठार मारण्यात आले होते. त्याचा सुड संभाजीच्या मर्द मराठ्यांना जरी घेता आला नाही. तरीही १००, १२५ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अधर्माने माजलेल्या आणि बाप मनूच्या कायद्याने उन्मत, मस्तवाल घमंडखोर भेकड ब्राह्मणशाही रुपी पेशवाईस छत्रपती शिवाजीच्या खऱ्या मर्द मावळ्यांनी चारी मुंड्या चीत केले होते. हाच वर्मी घाव पेशवाई नायनाट करण्यास कारक ठरला._

_बाजीराव जे बोलला ते शिव काळ असता बोलला असता काय? शिवबाने त्याची जिभच छाटली असती. पण कर्तृत्ववान महापुरुषांचे वारस तसेच निपजतील, असे कोणी ही सांगू शकणार नाही. काही अपवाद असू ही शकतात._ *_डॉ. बाबासाहेब म्हणायचे - "आमचे पूर्वज नक्कीच मेष राशीचे नव्हते. ते सिह जातीचे होते. याची जाण जर नादान बाजीरावास झाली असती. तर सरदार सिदनाकाची माणुसकीची मागणी मान्य केली असती तर... तर खरेच इंग्रज इथे १५० ते २०० वर्ष राज्य करू शकले असते? आम्हाला आमच्या पूर्वजांचा सार्थ अभिमान आहे.
...................................................................

लेखक -
*अनिल विक्रम जाधव : रायगड*
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

1 जनवरी

             1 जनवरी शौर्य दिवस
           ...................................
11 मार्च सन 1689 को  पेशवाओ ने हमारे शम्भाजी महाराज को खत्म कर उनके शरीर के अनगिनत टुकड़े कर तुलापुर नदी में फेक दिये थे और कहा कि जो भी इनको हाथ लगायेगा उसका क़त्ल कर दिया जायेगा। काफी समय तक कोई भी आगे नहीं आया पर महार जाति के एक पहलवान ने हिम्मत दिखाई और आगे आया जिसका नाम गणपत पहलवान था , वह शम्भाजी महाराज के सारे शरीर के हिस्सों को इकठ्ठा करके अपने घर लाया और उसकी सिलाई कर के मुखाअग्नि दी । शम्भाजी महाराज की समाधि आज भी उसी महार वाडे इलाके में स्थित है। ये सूचना मिलते ही पेशवाओ ने गणपत महार पहलवान का सर कलम कर दिया और समुची महार जाति को दिन में गाँव से बहार निकलने पर पाबन्दी लगा दी और कमर पे झाड़ू और गले में मटका डालने का फरमान लागू कर दिया था और पुरे पुणे शहर में यह खबर फैला दी कि गणपत महार पहलवान देव तुल्य हो गया है इसलिए वो भगवान की भेट चढ़ गया !
          शम्भाजी महाराज की मृत्यु के बाद महार जाति के लोगो पर खूब अत्याचार हुए जो इन पेशवाओ द्वारा किये जाने लगे ।
महार जाति शुरू से ही मार्शल जाति थी , पर पेशवाओ ने अब इन लोगो पर मार्शल लॉ (सेना में लड़ने पर रोक ) लगा दिया था।

महार अब इनके जुल्म से तंग आ चुके थे और अपने स्वाभिमान और अधिकार के लिए खूनी आंदोलन करने के लिए आतुर थे ।

उस दौरान अंग्रेज भारत में आये ही थे पर वो पेशवाओ की बलशाली सेना पर विजय नहीं कर पा रहे थे , तभी महार जाति का एक नव युवक सिद्धनाक पेशवाओ से मिलने गया और कहने लगा की वैसे तो हमारी अंग्रेजो की ओर से लड़ने की कोई इच्छा नहीं है मगर तुम हमारे सारे अधिकार और सम्मान हमे दे दो तो हम अंग्रेजो को यहाँ से खदेड देंगें , इस पर पेशवाओ ने कहा की तुम्हे  कोई हक और अधिकार हम नहीं देगे । यह सुनते ही सिद्धनाक ने पेशवाओ को चेतावनी देते हुए कहा की अब तुमने अपनी मृत्यु को स्वयं ही निमंत्रण दे दिया है , और अब तुम्हे कोई नहीं बचा सकता , अब हम रण भूमि में ही मिलेंगे ।

अब सिद्धनाक अंग्रेजो से मिला और उनसे कहने लगा कि तुम हमे अपने अधिकार और सम्मान लौटा दो , तो हम आपकी तरफ से इन पेशवाओ से लड़ने के लिए तैयार हैं ।                        
अंग्रेजो ने सिद्धनाक की बाते मान ली तब सिद्धनाक 500 महार सैनिको के साथ शम्भाजी महाराज की समाधी पर जाता है और महाराज की समाधी को नमन करते हुए शपथ लेता है कि हम शाम्भाजी महाराज के खून का बदला जरूर लेंगे और उसके बाद सात दिन तक चले युद्ध में भूखे प्यासे रहकर महारो के 500 वीरो ने पेशवाओ के 28000 सैनिकों के टुकड़े – टुकडे करके उनको नेस्त-नाबूद कर दिया ।

वो दिन था 01 जनवर 1818 का था इसलिए ये दिन “शौर्य दिवस ” नाम से जाना जाता  है ।
जहाँ स्वयं बाबा साहेब डॉ. भीम राव आंबेडकर जी ने इन महार वीरो के लिए अपने अश्रु बहाये थे और प्रत्येक साल 01 जनवरी को बाबा साहेब उन वीर योद्धाओं को श्रदांज अर्पित करने के लिए जाते थे।                               

तो आओ हम भी याद करे हमारे उन महान वीर योद्धाओं को जिन्होंने हमा हक और अधिकारो के लिए इतनी बड़ी लड़ाई लड़ी थी ।

              *जय संविधान जय भीम*

500 Soldier


कोरेगाव-भीमा युद्धातील 500 शूरवीर मावळ्यांचा अभिमान का बाळगावा?
    .......................................................
             छत्रपती शिवाजी राजांनी सुरू केलेला शिवशक पेशव्यांनी बंद पाडला आणि मुस्लिमांचा फसली शक सुरु केला. पेशव्यांनी छत्रपती संभाजीराजांना तीन वेळा मारण्याचा कट केला आणि शेवटी संस्कृतवरती प्रभुत्व मिळविल्यामुळे औरंगजेबाच्या ताब्यात देऊन ब्राह्मणीधर्मानुसार त्यांना हाल हाल करून ठार मारले.
      पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मराठा सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना तह करण्यासाठी बोलावून कैदेत टाकले आणि त्यांना कैदेत मारले.
        तिसऱ्या पानिपताच्या वेळेस अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता तर पेशवे यज्ञ,याग,होम हवं,भेदाभेद, व्रतवैकल्ये करण्यात दंग होते.म्हणजे सदाशिव पेशव्याने एक लाख मराठयांना अब्दालीच्या समोर नेवून बळी दिले,तेंव्हा महाराणी ताराराणी म्हणाल्या बरं झालं पेशवाई बुडाली.
     छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा  गादीचे वंशज पहिले छत्रपती प्रतापसिंह महाराज हे लहान वयात गादीवरती आले, तेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशव्याने त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली, कारण हा बाल छत्रपती शिकला तर शहाणा होईल आणि शहाणा झाला तर तो आपल्या अंकित राहणार नाही, म्हणून त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली. छत्रपती घराणे त्यांना चोरून शिकवेल म्हणून पेशव्यांनी सातारच्या राजवाड्याभोवती गुप्तहेर नेमले, तेव्हा छत्रपती प्रतापसिंह महाराजांची आई रात्री अडीच वाजता चोरून शिकवायची. छत्रपतींची ही अवस्था तर सामान्य रयतेचे पेशव्यांनी काय हाल केले असतील? याची कल्पना करा.
    पेशव्यांना धडा शिकवण्यासाठी सातारा येथून सैन्य घेऊन निघालेल्या छत्रपती चतुरसिंग भोसले यांना दगाबाजीने पकडून दुसऱ्या बाजीरावाने कोकणातील एका अंधाऱ्या किल्ल्यात डांबून हालहाल करून ठार मारले.
        अमृतराव पेशवेव्याने खंडणी न देणाऱ्या शेतकऱ्यांना तापलेल्या तव्यावर उभे करून छळले, तर शेतकऱ्यांच्या लहान मुलांच्या बेंबीत आणि कानात तोफेची दारू भरून त्याला अग्नी द्यायचा, यामुळे मुलांचे डोके आणि पोट फुटायचे, इसिस आणि तालिबान्याप्रमाणेच पेशवे क्रूर, निर्दयी आणि पाताळयंत्री होते.
      इंदूरच्या विठोजी होळकर यांना पुण्यात हत्तीच्या पायाला बांधून पेशव्यांनी हालहाल करून ठार मारले. पेशवेकाळात अस्पृश्यांना तर माणूस म्हणून जगायचा अधिकार नव्हता. त्यांचा प्रचंड छळ झाला.कंबरेला केरसुणी आणि गळ्यात मडके अशी अस्पृश्याची अवस्था होती.
     पेशव्यांनी सर्वाधिक छळ ब्राह्मण महिलांचा केला, त्या छळाचे या ठिकाणी वर्णन करणे देखील उचित ठरणार नाही. छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजे यांच्या समतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, लोककल्याणकारी, महिलांचा सन्मान करणाऱ्या शासन व्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम पेशव्यांनी केले, त्यामुळेच 500 शूरवीर मावळ्यांनी 300 ब्रिटिशांच्या मदतीने 28 हजार पेशव्यांचा पराभव केला. त्या 500 शूरवीरामध्ये मराठा, महार, मुस्लिम, राजपूत, मातंग धनगर, इत्यादी मावळे होते.
       मराठामहारमुस्लिम खांद्याला खांदा लावून भावाप्रमाणे पेशवाई विरोधात लढले. त्यांची यादी पेरणे कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभावरती आहे. त्या 500 सैनिकांपैकी खंडोजी माळवदकर हे एक शूर मराठा वीर होते. त्यांना ब्रिटिशांनी बक्षीस म्हणून जमीन इनाम दिली, त्यांच्या शेतात हा विजयस्तंभ आहे.
       500 मावळ्यांनी 300 ब्रिटीशांची मदत घेतली किंबहुना ब्रिटिश आणि पाचशे मावळे एकत्र येऊन पेशव्याविरुद्ध लढले, म्हणून त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही, कारण  1818 साली देश,राष्ट्र ही संकल्पना नव्हती, त्या काळात विविध संस्थाने होती. देश,राष्ट्र ही संकल्पना 1947- 1950 नंतर आली. 500 मावळ्यांना देशद्रोही ठरविणार्‍यांनी टिपू सुलतानविरुद्ध इंग्रजांना मदत करणाऱ्या पिशव्याबद्दल आपले मत स्पष्ट करावे, तसेच पेशव्यांनी 1802 साली इंग्रजाबरोबर वसईचा तह केला होता व इंग्रजांची तैनाती फौज पदरी बाळगली होती. छत्रपती प्रतापसिंह महाराजांना कैद करण्यासाठी इंग्रजांना मदत करणाऱ्या व शनिवारवाड्यावरचा जरीपटका खाली उतरवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकविनाऱ्यानी  राष्ट्रवादाच्या व देशप्रेमाच्या वल्गना करणे हास्यास्पद आहे.
       एवढे मात्र नक्की की शिवरायांच्या मावळ्यांचे 500 वंशज जुलमी पेशवाईविरुद्ध खांद्याला खांदा लावून 1 जानेवारी 1818 रोजी लढले व शिवस्वराज्याची वाताहात लावणाऱ्या पेशव्यांना धडा शिकवला, त्यांचा तमाम मराठा, बौद्ध,ओबीसी,एससी, अल्पसंख्यांक मुस्लिम यांना अभिमान वाटायला हवा. त्यामुळे मीही 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत आहे.आपल्या पूर्वजानी एकोपा जपला,आपणही एकोपा जपूया!
      ---- श्रीमंत कोकाटे
         (इतिहास अभ्यासक)
संदर्भग्रंथ-
1)छत्रपती शिवाजी महाराज-वा सी बेंद्रे
2)छत्रपती संभाजी महाराज-वा सी बेंद्रे
3)नामांतर औरंगाबाद आणि पुण्याचे-शरद पाटील
4)सातारच्या राज्यक्रान्तिचा इतिहास-प्रबोधनकार ठाकरे
5)दाभाडे घराण्याचा इतिहास-परांडकर
6)महात्मा फुले -धनंजय कीर

युवक कसे असावेत - Dr. Ambedkar

                  युवक कसे असावेत
                ------------------------------
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाड येथे युवकांना मार्गदर्शनपर केलेलं भाषण :

         *बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणतात , "मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे -पिणे जगणे ही आयुष्यातील इतिकर्तव्यता  मानता कामा नये . खाणे -पिणे हे जगण्याकरीता असावे व जगणे हे मानमरातबांचे व समाजास भूषणभूत होण्यासाठी  समाजसेवेचे असावे."" खायला काळ व भुईला भार " असे जगणे काय असले काय नी नसले काय सारखेच. तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे . तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते. म्हणूनच आपल्यात एक म्हण रूढ आहे की, ' तप अंती फळ. ' कार्य आत्मोन्नतिचे असो वा राष्ट्रोन्नतीचे असो कशाचेही का असेना त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे आहेत. माणसाने त्या कार्यास स्वतःस वाहून घेतले पाहिजे. मी अनेक अर्वाचीन तरुण पाहिले आहेत की, जे १५ मिनिटे टेबलावर सतत बसू शकत नाहीत, त्यांना घटकोघटकी विडी ओढावी लागते, चहा प्यावा लागतो, त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही . हे योग्य नाही २४ तासापैकी २० तास सतत टेबलावर बसून काम करता आले पाहिजे मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे व परदेशातही २० तास बसून काम केले आहे . ज्या कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवावयाचा आहे त्यांनी श्रम केले पाहिजेत. मनुष्य संकटात अगर दारिद्र्यात सापडला म्हणजे तो निराश होत असतो. आपणास यश मिळणार नाही अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होते. जर का या भावनेने मनुष्यास घेरले म्हणजे तो मनुष्य आयुष्यात कुचकामाचा ठरतो. हरेक तरुणाने आशा कधीच सोडू नये. ज्या दिवशी तो आशा सोडील त्या दिवशीच तो जगात जगला काय आणि मेला काय सारखाच होईल. हरेक तरुणात महत्वाकांक्षा असली पाहिजे. महत्वाकांक्षेशिवाय मनुष्य धडपड व प्रयत्न करूच शकत नाही. यासाठी अस्पृश्य तरुणांमध्ये महत्वाकांक्षेचे बीज प्रथम रुजले पाहिजे . आज विद्येची द्वारे आपणास  मोकळी आहेत. आज शिक्षणाच्या ज्या सवलती आहेत त्या आमच्या वेळी नव्हत्या. आम्हास त्या काळी कोणाचीच मदत नव्हती. मला विश्वविद्यालयात असता माझे वडील व कुटुंबातील मंडळी ८ बाय ८ च्या लांबी रुंदीच्या खोलीत राहून कॉलेजचा अभ्यास करावा लागत असे आजची स्थिती बदललेली आहे . आपल्यापैकी प्रत्येकाने सुविद्य व्हावे अशी माझी फार इच्छा आहे. कारण शिक्षण हि तलवार आहे . शिक्षण हे शस्त्र आहे. जर एखादा मनुष्य येथे तलवार घेऊन आला तर आपण सर्वजन त्यास घाबरून जाल. परंतु विद्येचे शस्त्र हे नेहमी वापरणाऱ्यावर अवलंबून असते. हत्याराने अबलांचे संरक्षण मनुष्य करू शकेल . चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम परंतु वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसांच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्त्र पशूपेक्षाही क्रूर व भितीप्रद समजण्यात यावा. दीनदुबळ्या , गरीब शेतकऱ्यांना शिक्षण नाही. त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा शिकले-सवरलेले शेठजी, भटजी वकील वैगैरे सर्व लोक घेतात . अशा तऱ्हेने गरीब जनतेस नाडण्याकडेच जर या शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर धि:कार असो अशा शिक्षणाचा. आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच दीनदुबळ्या जनतेच्या उद्धारार्थ न करता जर शिकून आपली नोकरी भली , आपले बायका मुले भली या भावनेने आजचे शिकलेले तरुण वागणार असतील तर त्यांचा समाजाला काय उपयोग ? तरुणांनी आपली जबाबदारी ओळखून कार्यास लागावयास हवे जनतेच्या अंगी जो भित्रेपणा दिसतो . त्याला फक्त तरुणच बदलू शकतील. त्यासाठी प्रथम कंबर कसली पाहिजे. मी काही गांधीजीप्रमाणे महात्मा नाही , माझ्यामागे तुम्हा लोकांच्या अभेद्य ऐक्याचे कवच आहे, त्यानेच मला बळकटी आली आहे. म्हणून तुम्ही आपआपसांत भांडू नका. मानापानासाठी चढाओढ करुन एकमेकांत बेकी करु नका . जगात फुकट्याला काहीच मानसन्मान मिळत नाही, ही गोष्टही विसरु नका....*_
डॉ बाबासाहेब आंबेडकर.

*संदर्भ :~ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भाषणे आणि लेखन ,खंड १८,भाग २