Buddha Teaching
तथागत बुद्धाने काय स्वीकारले.
....................................................................
*1. माणसाचे मन हे प्रचंड शक्तिमान आहे.*
*2 . मनाची शुध्दता व अशुद्धता हिच सुख दुःखाचे मुख्य कारण आहे.*
*3. मनावर जसे संस्कार करावे तसे होऊ शकतात (चांगले/ वाईट)*
*4. मनाला मेडिटेशन(ध्यान) द्वारा निर्मळ , नितळ व शुद्ध बनवले जाऊ शकते.*
*5. व्यक्तीच्या सुख दुःखाला तोच मुख्यता जबाबदार असतो. (इतर केवळ मार्गदर्शक असू शकतात.)*
*6. व्यक्तीला या जन्मातच दुःख मुक्त होता येते.*
*7. जगात कारणाशिवाय काहीच घडत नाही.*
*8. जसे कारण तसाच परिणाम होतो.*
*9. विकारयुक्त मनच शारीरिक मानसिक दुःख निर्माण करते.*
*10. मनाची शुद्धता, निर्मलता हा बुद्ध धम्माचा मूळ केंद्रबिंदू आहे.(कारण त्यातच सुख दडले आहे).*
*11. विश्वात सर्व काही अनित्य आहे, परिवर्तनशील आहे.*
*12. मूर्खापासून संगत करण्यापेक्षा एकटे राहावे.*
*13. क्रोध हा अग्नी आहे, तो मनुष्यमात्राला जाळतो.*
*14. वैराने वैर कधीच मिटत होत नाही ते अवैरानेच मिटते.*
*15. अष्टांगिक मार्गाने जगणे हाच बुद्धाचा श्रेष्ठ धम्म आहे.*
*16. अरहंत पद, संबोधी, बुद्धत्व, निब्बान मानवी जीवनातील सर्व श्रेष्ठ अवस्था आहेत.*
*17. बुद्ध धम्म हा नैसर्गिक सत्यावर आधारलेला एकमेव धम्म आहे.*
*18. कोणतीही गोष्ट जर विचार, तर्क व विवेकाच्या कसोटीवर सिद्ध होत नसेल तर ती स्वीकारू नये.*
*19. आळस, अनैतिकता, दूराचार, द्वेष, अहंकार, घृणा, तिरस्कार, आसक्ती, लोभ हेच व्यक्तिच्या सर्वनाशाला कारण ठरतात.*
*20.मनातिल विकार (मी व माझे प्रती आसक्ती, क्रोध द्वेष, इर्षा, अहंकार) नष्ट केल्यास आपण सर्व श्रेष्ठ सुख प्राप्त करु शकतो.*
*!! भवतु सब्ब मंगलम् !!*
*" बुध्दं सरणं गच्छामि "*
*" धम्मं सरणं गच्छामि "*
*" संघं सरणं गच्छामि "*
!! मंगलमय सप्रेम जयभिम !!


0 टिप्पणियाँ:
एक टिप्पणी भेजें
सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]
<< मुख्यपृष्ठ