बुधवार, 22 अगस्त 2018

भिमा तुझ्या मताचे...

*भिमा तुझ्या मताचे*
*जर पाच लोक असते,*
*तर काँग्रेस राष्ट्रवादी,*
*भाजप सेना मनसेत,*
*कुणी गेलेच नसते.*

*भिमा तुझ्या मताचे*
*जर पाच लोक असते ,*
*एकत्र सगळे राहिले असते,*
*स्वतःचे नाही,*
*समाजाचे हित पाहिले असते.*

*भिमा तुझ्या मताचे*
*जर पाच लोक असते,*
*मंत्री पदासाठी लाचार ते झालेच नसते,*
*एकाच वाटेने सगळेजण गेले असते,*
*शोधले नसते त्यांनी*
*वेगवेगळे रस्ते.*

*भिमा तुझ्या मताचे*
*जर पाच लोक असते ,*
*भारत देशाचे चित्र बदलले असते ,*
*गरीब येथे कुणीच नसते,*
*आन्याय,अत्याचार झालेच नसते ,*
*येथे समतेचे राज्य असते,*
*आनंदाने जन हसले असते ,*
*चेहऱ्यावर समाधान दिसले असते .*

*भिमा तुझ्या मताचे*
*जर पाच लोक असते,*
*भैय्यासाहेब भोतमांगे*
*मुळीच खचले नसते,*
*नितीन आगे सारखे*
*अनेक तरुण वाचले असते ,*
*मोहन भागवत घटना* *बदलण्याची भाषा बोललेच नसते.*
*भिमा तुझ्या मताचे*
*जर पाच लोक असते .*

        

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ