शनिवार, 11 अगस्त 2018

भारतीचे संविधान आणि मनुस्मृती

भारतीचे संविधान आणि मनुस्मृती
काय होते या मनुस्मृती मध्ये जाणून घेऊन या भारताचे संविधान आणि मनुस्मृती यामधील फरकातून:-
१) मनुस्मृती:- [1.31, 429, 499]  मनुस्मृतीनुसार ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र हे जन्मत: `असमान` आहेत. कारण,
ब्राम्हणोस्य मुखमासीद बाहू राजन्य कृत्य:।
उरु तदस्य यह वैश्य: पदभ्यां शुद्रो अजायत॥
अर्थ - ब्राम्हणांचा जन्म ब्रम्हाच्या मुखातून झाला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहुतून, वैश्यांचा जन्म मांडीतून आणि शुद्रांचा जन्म ब्रम्हाच्या पायातून झाला आहे.
संविधान:- [कलम 14.] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक `समान` आहेत. त्यांचा धर्म,वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही.
२) मनुस्मृती:-[99, 98, 1.91]  मनुस्मृतीनुसार चार वर्णातील लोकांना सरकारी नोकरी मिळविण्याचा समान अधिकार नाही. शुद्र व्यक्ती न्यायधिश बनू शकत नाही व ब्राम्हणांशिवायशिक्ष­कीपेशा कोणीही करु शकत नाही.
संविधान:- [कलम 16] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना जात, धर्म, वंश, जन्म किंवा भाषा याची कोणतीही अडचण न आणता सरकारी नोकर्‍या मिळविण्याचा समान संधी देते.
३) मनुस्मृती:- .[1.88, 98, 90, 130]  मनुस्मृती नुसार ब्राम्हणांशिवायअन्य कोणालाही स्वातंत्र्य नाही, व्यवसाय करण्याचेही स्वातंत्र्य नाही. प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेले, ब्राम्हण शिक्षण घेणार, यज्ञ करणार, क्षत्रियांनी राजकारभार करावा, वैश्यांनी व्यापार करावे. आणि शुद्रांनी या सर्वांची सेवा करावी.
संविधान:-[कलम 19] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल केली आहेत. त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, रहाण्याचा व स्थायिक होण्याचा तसेच कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क असेल.
४) मनुस्मृती:- [अध्याय 715, 716]  मनुस्मृतीनुसार क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना गुलाम बनविले जाऊ शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत ब्राम्हणांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही.
संविधान:- [कलम 23] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधान सांगते की, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. कोणत्याही परिस्थितीत माणसांना विकता किंवा विकत घेता येत नाही. किंवा त्यांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही. याचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.
५) मनुस्मृती:- [1.88, 89, 90, 91]  मनुस्मृतीनुसार फक्त ब्राम्हणांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही.
संविधान:- [कलम 21ए] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार या कलमान्वये शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. राज्य हे, सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यँतच्यासर्व मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व सक्तीचे शिक्षण देईल.
६) मनुस्मृती:- [1.100, 10, 129]  मनुस्मृतीनुसार ब्राम्हण जगातील सर्व संपत्तीचा मालक आहे. शुद्र कितीही लायक असला तरी त्याला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. कारण शुद्राने संपत्ती जमा केल्यास ब्राम्हणांस त्रास होतो.
संविधान:- [कलम 300 क] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही`. कायद्याने कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपत्तीच्या अधिकारापासून परावृत्त केले जाऊ शकत नाही. त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे.
७) मनुस्मृती:- [मनुस्मृती 8.276]  मनुस्मृतीनुसार शुद्राने ब्राम्हणाची निंदा केल्यास त्याची जीभ कापावी, परंतु तोच अपराध ब्राम्हणांनी केल्यास त्यास राजाने कमीत कमी शिक्षा द्यावी.
संविधान:- परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्या दुसर्‍या व्यक्तीची निंदा, भाषा किंवा लिखीत स्वरुपात केली असल्यास त्यास प्रचलीत कायद्यानुसार दोन वर्षाची सजा किंवा जुर्माना किंवा दोन्ही सजा दिल्या जाते.
८) मनुस्मृती:- [8. 359] मनुस्मृतीनुसार ब्राम्हण स्त्री बरोबर कोणी व्यभीचार केल्यास त्यास मृत्यूदंड द्यावा परंतु ब्राम्हणाने क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांच्या स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास फक्त  सौम्य दंड करावा.
संविधान:- मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल. आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही कोणत्याही स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास पाच वर्षाची शिक्षा व जुर्माना किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातात.
९) मनुस्मृती:- [11.127, 129.30, 10.381]  मनुस्मृतीनुसार ब्राम्हणाच्या हत्येची शिक्षा फक्त मृत्यूदंड आहे. परंतु ब्राम्हणाने कोणाची हत्या केल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा करता येत नाही कारण ब्राम्हण हत्येपेक्षा मोठा अपराध पृथ्वीतलावर नाही. त्यामुळे राजाने ब्राम्हण वधाचा विचारही मनात आणू नये.
संविधान:- परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल. आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार हेतु पुरस्पर हत्या केली असल्यास त्याच्या या कृत्याला मानव हत्त्या समजून त्यास मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास या शिक्षा दिल्या जातात.
तर ह्या दोघात काय फरक आहे  तो दिसला .
तर आता काय जाळायला हवं पण जाळलं गेलं आज संविधान ...
साधी आई वरून शिवी आपल्याला दिली तरी आपण कॉलर पकडतो तर ह्यांनी तर आपल्या आई बहिणींना वेश्या वगैरे लिहले आहे मनुस्मृतीत आणि त्यातून बाहेर काढले बाबासाहेबानी संविधान देऊन त्याला हे जाळून काय साध्या करत आहेत की पूर्ण अखिल स्रिया वेश्या आहेत ...कारण पूर्ण स्रिया गप्प आहेत आणि इतर समाजही.

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ