Caste
नमस्कारचे सुद्धा आता
तुकडे पडलेत...
'जय जिजाऊ', 'जय भीम','जय भगवान', 'जय मल्हार','जय रोहिदास', 'जय राणा'...
सकाळ सुद्धा आता
*'जात'* घेऊनच उगवते...
'शिवसकाळ', 'भिमसकाळ',
'लहूसकाळ'...
समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन, हातात लेखणीची मशाल घेऊन, क्रांतीची भाषा करणारे कवी सुद्धा आता *'जात'* सांगून टाकतात...
'शिवकवी', 'भीमकवी', 'मल्हारकवी'...
वादळं सुद्धा आता
*'जात'* घेऊन येतात
'भगवं वादळं', 'निळं वादळं','हिरवं वादळं', 'पिवळं वादळं'...
रंगात विभागलेत आता
पाऊस, वारा, वादळं,
शहरातली दुकाने
अन्...
गावच्या वेशीसुद्धा...!
पण ...
रक्ताचा 'रंग' मात्र
अजूनही *'लालच'*..............!
😔😔😔
*''मनुष्य हीच खरी आहे जात''* *भारतीय हीच आपली जात*


0 टिप्पणियाँ:
एक टिप्पणी भेजें
सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]
<< मुख्यपृष्ठ