शुक्रवार, 17 अगस्त 2018

About Indian Constitution

           *संविधान हाच आमच्या मुक्तीचा मार्ग !*
........................................................................
*वैदिक मनुवादी विचारधारेच्या सांस्कृतिक दहशतवाद्यानी भारताचे संविधान जाळले...!*
         त्यांच्याच बापजाद्यानी दि. 18 डिसेम्बर 1949, ह्या दिवशी डॉ. बाबासाहेबांचा पुतळा दिल्लीच्या रामलिला मैदानावर जाळला होता. डाॅ. आंबेडकरांचा पुतळा जाळण्याचे स्पष्ट आणि सर्वात महत्वाचे कारण बाबासाहेबांनी भारतीय महिलांच्या उत्थानासाठी तयार केलेले "हिंदु कोड बिल" ज्या तथाकथित वैदिक हिंदुधर्माने अर्थात वैदिक ब्राह्मणी धर्माने तमाम बहुजन स्रीयांनाच नव्हे तर  ब्राह्मण स्रीयांना देखील शुद्र घोषीत केले होते, *स्री ही भोगवस्तु आहे, स्री हे नरकाचे द्वार आहे, स्री शिकली तर तुमच्या सात पिढ्या नरकात जातील अश्या प्रकारचे गलिच्छ विचार समाजात पसरवले होते.* त्या आमच्या माताभगिनिंसाठी, डाॅ. आंबेडकरांनी आणि संविधान सभेतील तिनशे मान्यवरांनी भारतीय स्रियांच्या स्वातंत्र्यासाठी,त्यांच्या न्याय हक्कासाठी *हिंदु कोड बिल* तयार केले. हिंदु कोड बिल तमाम महिलांच्या हक्काची सनद होतीच पण यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे *ब्राह्मण महिलांना देखील हक्क आणि अधिकार होते, तरीही वैदिक ब्राह्मणी मनुवाद्यानी भारतीय संविधान का जाळले ?*
कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम भारतीय महिलांना•••••
*पालकत्वाचा_अधिकार-* Right to Guardianship
*मालमत्तेचा अधिकार-* Right to Property
*घटस्फोटाचा अधिकार-* Right to Divorce
*प्रसूती पगारी रजा-* Pregnancy Leave/Maternity Benefit Act
*ना स्त्रिया ना पुरुष समान कामाला समान पगार*
Equal Pay for Equal Work
*महिला कामगार संरक्षण कायदा*
Women Labor Protection Act
*भारतीय संविधान जाळले गेले आणि देशद्रोही घोषणा दिल्या*••••••••

*"संविधान जलाओ, संविधान मुर्दाबाद, आंबेडकर जलावो, मनूवाद लावो"*
या राष्ट्रद्रोही घोषणा देणारे कोणत्या देशाचे नागरिक आहेत आणि कोणत्या देशभक्तीच्या श्रेणीत आहेत..?

प्रश्न हा आहे कि...
*भारत देशात स्वातंत्र्याच्या बहात्तर वर्षात संविधान जाळले गेले नाही आणि आजच ते वैदिक ब्राम्हणवाद्यानी का जाळले ?*

कारण....
*आता काळ झपाट्यानं बदलत आहे. तळागाळातील समाजात संविधान विषयक जागृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मराठा, कुणबी, शद्रातिशुद्र, स्रिया, मागास, भटके विमुक्त, आदिवासी यांनी मान्य केलेले आहे की, डाॅ. आंबेडकरांनी भारतीय संविधानात आमच्या हक्क आणि अधिकारांचे प्रावधान कले आहे आणि संविधान हाच एकमेव आमच्या मुक्तीचा मार्ग आहे.*
कारण आजच्या वर्तमानात तमाम  बहुजन समाजातील जातींना माहिती आहे की आम्हाला संविधानाने जे दिलंय ते असे आहे••
१ *संविधान कलम १* मुळेच हिंदुस्तानचा *भारत* झाला.
२ *संविधान नागरिकत्वाच्या कलम ५ मुळेच हिंदू, मुस्लिम,शिख, जैन, ख्रिश्चन या ओळखींच्याही पुढे जाऊन "भारतीय"* ही आमची ओळख निर्माण झाली.
३ *संविधान कलम १४ मुळेच* कायद्या समोर सर्व समान झाले.
४ *संविधान कलम १५ मुळेच* पिढ्यानपिढ्या शिक्षण नाकारलेल्या मागासवर्गीयाना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला व ते शिकून त्यांचा आणि इतरांचा देखील विकास करु लागले.
५ *संविधान कलम १६ मुळेच* शासकीय नोकरीत वंचितांना देखील प्रतिनिधित्व मिळाले.
६ *संविधान कलम १७ मुळेच* माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अस्पृश्यतेला हद्दपार करण्यात आले.
८ *संविधान कलम १८ मुळेच* राजेशाही, नवाबशाही भारतातून नष्ट करण्यात आली.
९ *संविधान कलम २३, २४ मुळेच* वेठबिगारी व बालमजुरी या प्रथा बंद होऊन त्याना शिक्षणाची कवाडे खुली झाली.
१० *संविधान कलम २५ मुळेच* प्रत्येकाला त्याच्या आवडीचा धर्म स्वीकारण्याचे व त्याचे पालन करण्याचे अभय व स्वातंत्र्य मिळाले.
११ *संविधान कलम २९ मुळेच* अल्पसंख्याकाना संरक्षण मिळाले.
१२ संविधानामुळेच *संसदीय लोकशाही* अस्तित्वात आली.
संविधानामुळेच गरिबातल्या गरीब व श्रीमंतातील श्रीमंत यांच्या मतांचे मूल्य एकच झाले.

*जस जसे बहुजनांचे मानवी हक्क आणि अधिकार वाढले तस तसा वैदिक ब्राह्मणी मनुवाद कणाकणाने तुटू लागला आहे.*
*ही जाणिव वैदिक ब्राह्मणी मनुवाद्याना झाल्यामुळेच आज ते भारतीय संविधान जाळुन भारतात सांस्कृतिक दहशतवादी देशद्रोही आणि राष्ट्रद्रोही कार्य करत आहेत.*
 
चला तर, या मनुवादी संघीय प्रवृत्तीचा लोकशाही पद्धतीने प्राणपणाने विरोध करु या !

भारतीय संविधानाचे प्राणपणाने सरंक्षण करु या !!
                    ••••••••••••••••••••

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ