गुरुवार, 20 दिसंबर 2018

डॉ. आंबेडकर कविता

                      कविता
                        .......

*👉🇪🇺झुंझार या* *देशाच्या मातीत भीम आहे*
*बेभान वादळाच्या साथीत भीम आहे।|*

*पेटवून दीप या इथेच शिक्षणाचे*
*मेणबत्तीच्या त्याच वातीत भीम आहे।।*

*समजून शिक्षणास दूध वाघिणीचे*
*गर्जणाऱ्या प्रत्येक छातीत भीम आहे।।*

*देऊन मानवास तो मंत्र समतेचा*
*प्रत्येक माणसांच्या जातीत भीम आहे।।*

*ठरवून ध्येय सारे मनाशी जिद्दीने*
*पेटुन उठणाऱ्या पेनात भीम आहे।।*

*लिहून राज्यघटना श्रेष्ठ भारताची*
*देशवंदनेच्या सलामीत भीम आहे*

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ