शुक्रवार, 17 अगस्त 2018

पुढील बौध्द पिढी का घडत नाही?


          पुढील  बौध्द पिढी का घडत नाही?
        ++++++++++++++++++++++++

🙏🏻काही अज्ञानी पालकांमुळे बौध्द धर्माची माहीती पुढील पिढीला पोहचत नाही.
🙏🏻 बौध्द युवक युवतींना स्वत:च्या धर्माची माहीती मिळवण्यात ईंटरेस्ट नाही.
🙏🏻अर्ध्या पेक्षा जास्त बौध्द युवकांना स्वत: बौध्द असल्याची नीट जाणीव नाही.
🙏🏻बौध्द धम्माचा प्रचार करायला आमच्या लोकांना लाज वाटते.
🙏🏻सर्वधर्मसमभावाचे कारण पुढे करून सर्रास हिंदु धर्माचा उदो उदो  करत फिरतात आणि बौध्द धर्माकडे अक्षरशः पाठ  फिरवितात.
🙏🏻समाजाचे प्रबोधन करायला कोणीही पुढे येत नाही आणि जरी कोणी येत असेल तर त्याला पाठींबा देत नाहीत.
🙏🏻शिर्डी, तिरुपती, बालाजीला  हजारो रुपयॆ देवून  नवस करतील किवां दान करतील पण बुध्द विहारात 10 रुपये देतांना विचार करतील /अनेक  बहाणे सांगतील.
🙏🏻आजुबाजुला गणपती बसतात म्हणुन ह्यांचा सुध्दा आराध्य दैवत गणपतीच होतो.
🙏🏻बाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुध्दांचे फोटो पण आत अनेक  देवांचा किचनमध्ये किंवा  महापुरुषांच्या फोटोच्या बाजूला  देव्हारा.
🙏🏻 देव्हा-यातील वात कधीही  विझू दिली जात नाही  , मात्र बाबासाहेबांच्या तसबिरीला साधा हार सुद्धा घालत नाहीत.
🙏🏻बुध्द विहारांची देखरेख तर सोडा  आठवड्यातून एकदा  विहारात वंदन करायला जायला  सुध्दा  यांना जमत नाही.
🙏🏻घरात बौध्द ग्रंथ नाहीत.वाचन व आचरण तर नाहीच नाही.
🙏🏻आपल्या समाजाच्या मिटींगला जायला आम्हाला जमत नाही किंवा वेळच नसतो.
🙏🏻 विहारात चिटपाखरू फिरकत नाही मग श्रामणेर/ भंतेजी चारिका बनण्यासाठी कुठून कोण  येणार ?
🙏🏻बौध्दांचं अस्तीत्व त्याच्या देशातून मिटण्याच्या मार्गावर  आहे ज्या देशात या धम्माचा  उदय झाला.
🙏🏻  आपले अनेक लोक फक्त लग्न, बारसे  ( नामकरणविधी )बौध्द पध्दतीने करतात लोकं नाव ठेवु नये म्हणुन....
आणि पाया पडायला कुलदेवता,  देवळात ,शिर्डीला जातात.
🙏🏻 आपल्या समाजात काही खुप वाईट सवयी आहेत एखादा आपल्या समाजातील कोणी नोकरी ला लागला की जवळपास च्या आपल्या लोकांना चांगले दिसत नाही
खुप दुक्खी होतात
🙏🏻
एखाद्याने जर राहण्यासाठी चांगले घर बांधत असेल तर बाकीचे आपले लोक त्याला विचारतत की खुप पैसे आहेत वाटते तुझ्याकडे, बापरे खुपच पैसा जमा केला वाटते अस्या प्रकारे हिनवतात
🙏🏻एखादा गरीब असला की त्याला गोड़ बोलतात पण तोच जर् कुठे जॉब करत असेल तर त्यांच्या टिंगल टवाली करतात
🙏🏻आपल्या समाजातील काही लोकानां आपला माणूस पुढे गेलेला मुळीच आवडत नाही .ही सर्वात मोठी शोकांतिका आहे
🙏🏻आपल्या समाजातील लोक स्वतः काहीच करत नाहीत आणि दुसऱ्याला पण काहीच करु देत नाहीत
🙏🏻 आपल्या समाजातील बरेच तरुण मुले ही व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत
🙏🏻समाजात जर बदल हवा असेल तर इतराना सुद्धा समोर घेऊन चालावे लागेल
🙏🏻आपल्या समाजातील एखाद्याने जर एखादा छोटासा उद्योग सुरु केला तर आपलेच लोक त्याचा उद्योग टिकु देत नाहीत, त्याच जगण मुश्किल करतील

🙏🏻 आपल्याच माणसाने जर शाळा , महाविद्यालय सुरु केले तर  त्या शाळेत स्वताच्या मुलांना पाठविनार नाहीत कारण त्यांना ते बरे दिसत नाहीत आणि ती शाळा कधी बंद होईल या कड़े जास्त लक्ष देतील
🙏🏻आपल्याच समाजातील लोक भण-भण इकडे तिकडे फिरत राहतील स्वतः चा विकास कधीच करणार नाहीत आणि दुसर्याचा विकास सुद्धा होऊ देणार नाहीत
🙏🏻आपल्याच समाजातील एखादा मानुस जर निवडणुकीत उभा राहीला तर त्याला मतदान करणार नाहीत आणि तो निवडणूक कसी हारेल, कसा पराभव होईल या साठी खुप कष्ट करतील

🔵🔵 तेव्हा आता विचार करा की आमच्या  मुलांना बुध्द कुणी  सांगायचे ? आणि मग आपण इतर अधर्मिय  बौध्द बनवायचे सोडा, पण बौद्ध धम्म घेतलेल्या   लोकांना  बुध्दीस्ट कसे बनवणार?  
                               जयभिम
        🔸🔸🔸🔸🔸🔷🔷🔸🔸🔸🔸🔸

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ