शुक्रवार, 17 अगस्त 2018

About भुतान

       भुतान, जगातले प्रथम क्रमांकाचे आनंदी   
                      राष्ट्र कसे बनले.?
       ########################
                                           -प्रा.हरी नरके

*_भुतान, हिमालयाच्या कुशीत वसलेला एक नितांतसुंदर देश आहे._*

*_शून्य प्रदुषण. देशभर कमालीची स्वच्छता, शांताता, सुरक्षितता आहे._*

*_हसतमुख पणा हा या देशातील सर्व लोकांचा स्वभाव आहे._*

*_मानव विकास निर्देशांक आणि हॅपी इंडेक्स (Happy lndex) अशा दोन प्रकारे जगातील देशांची सुची तयार केले जाते._*

*_जगातील सुमारे 222 देशांच्या आनंदी राष्ट्रांच्या यादीत भुतान प्रथम क्रमांकावर आहे._*

*_खरं तर भुतान आपल्यापेक्षा खुप गरीब देश आहे. तरीही इथला माणूस आनंदी  प्रसन्न व सुखी आहे._*

*_का आहे ? कसं जमलं त्यांना हे ?_*

*_तर, भुतानमध्ये सर्व प्रकारचे KG_*_(Kinder Garden)_*_ते  PG_* _(Parental Guidance)_*_सर्व शिक्षण मोफत आहे._*

*_तसेच, भुतानमध्ये सर्व प्रकारची आरोग्यसेवा मोफत आहे._*

*_हिमालयात असल्यानं डोंगराळ भाग. पारो हा एकमेव विमानतळ. तोही भारतानं नेहरूंच्या काळात तयार करून दिलेलं._*

*_थिंफू हे सध्याचं राजधानीचं शहर. शहराच्या मुख्य रस्त्या लगतच्या हॉटेलात एकही हॉर्न ऐकू येत नाही. सिग्नलची गरज पडत नाही. स्वयंशिस्तीने लोकं गाड्या चालवत असल्यानं हॉर्न नाही. सिग्नल नाही. ट्रॅफिक जॅम नाही._*

*_तुम्ही जगात कुठेही गेलात तरी प्रत्येक हॉटेलात पाट्या दिसतात. चोरांपासून सावध राहा. तुमचे किमती सामान चोरीला गेल्यास हॉटेल मॅनेजमेंट जबाबदार नाही. वगैरे._*

*_भुतानमधल्या कुठल्याही हॉटेलात अशा पाट्या दिसत नाहीत. कारण, प्रवाश्यांच्या सामानाच्या चोर्‍या झाल्या तर ते परत येणार नाहीत. तेव्हा, नो चोर्‍या असा संस्कार प्रत्येक भुतानीवर असल्यानं तिथं चोर्‍या होत नाहीत._*

*_हॉटेलातील कष्टाची कामं मुलीही तत्परतेनं करतात. टुरीझम हा त्यांचा मुख्य व्यवसाय. शेती दुसरा. उद्योगधंदे फारसे नाहीत._*

*_शील जपा. गरजा कमी करा. चो-या आपोआप बंद होतील. सुख नांदेल ! हा येथील मुल मंत्र_*

*_भारतीय माणसांना त्यांच्या नोटा घ्यायची गरज नाही. आपली करंसी तिकडे चालते. हिंदी सर्वांना येते. पासपोर्टची गरज पडत नाही._*

*_भारतीयांबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. कारण, आपण बुद्धाच्या देशातले म्हणून. भुतान हे प्रामुख्याने बौद्ध राष्ट्र आहे._*

*_इतका स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि स्वस्ताई असलेला देश जगात दुसरा नाही._*

*_यातून भारतानं घ्यायचा धडा हा आहे की, भारतातील सर्व आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था मोफत करा._*

*_सिल पालन केल्यास सर्व प्रकारच्या चोर्‍या बंद होतील._*

*_माणसाला सगळ्यात जास्त काळज्या असतात त्या..._*

*_मुला-मुलींचं शिक्षण कसं होणार ?_*

*_आपलं म्हातारपणी आरोग्याचं काय होणार ?_*

*_आणि, कमावलेलं सगळं चोरीला गेलं तर आपलं कसं होणार ?_*

*_हे प्रश्न सुटले की, माणूस आनंदी होऊ शकतो. मुख्य म्हणजे वख-वख नसली की माणसं सुखी होऊ शकतात._*

*_भारतानं भुतानकडून हे शिकायल हवं._*
                .............................

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ